मुरबाड जवळील नाणेघाटाच्या पायथ्याशी असलेल्या फांगणे गावातील ग्रामस्थांनी गावातील साठी नंतरच्या पिढीला शिक्षित करण्याचा संकल्प दोन वर्षांपूर्वी केला केला.६० हून अधिक वय असलेल्या या आजीबाईंच्या शाळेची नोंद आता लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. गावातील जुनी पीढी ज्यांचं शिक्षण काही कारणांमुळे अपूर्ण राहिलं अशा पिढीला सुशिक्षित करण्याच्या संकल्पनेतून ही शाळा सुरू झाली. गावातील ज्येष्ठ नागरिकांना किमान अक्षर ओळख आणि आकडेमोड करता यावी, याहेतूने ही शाळा सुरू झाली. विशेष म्हणजे गावातील ज्येष्ठ महिलांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.हातात दप्तर, पाटी, पुस्तक घेऊन रोज नवीन काही शिकायला मिळेल या उद्देशानं आजी शाळेत येतात.दररोज दुपारी २ ते ४ या वेळेत ही शाळा भरते. या शाळेतील विद्यार्थ्यांचे वय किमान ६० ते ९० या दरम्यान आहे.वय जास्त असलं तर प्रत्येकांची नवीन काहीतरी शिकण्याची इच्छाशक्ती जबरदस्त आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews